वारी पंढरीची वारी आरोग्याची
दिवस -17
फळ – संत्री
संत्री, संतरा, नारंगी अशा नावांनी प्रचलित असे लोकप्रिय फळ.
संत्री गोड आंबट अशी विशेषतः ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्यात वापरावी , थकवा, वजन कमी होणे, अनेक दिवसांपासून आजारी आहे, उपवास केले आहेत अश्यांनि तसेच त्वचा, केस, डोळे व रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी.
संत्री हे अत्यंत स्वादिष्ट तसेच पौष्टिक फळ आहे.
संत्रीमध्ये विपुल प्रमाणात विटामिन C असते त्यामुळे शरीराला संसर्गांपासून लढण्याची ताकद मिळते. सर्दी, ताप, खोकला होण्याचा धोका कमी होतो.
विटामिन C हे लोहाच्या शोषणाला मदत करते, व अशक्तपणा होण्याची शक्यता कमी करते,
संत्र्यातील रेषायुक्त तंतुमुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी करून पोट साफ करण्यास मदत करते .
संत्री रक्तदाब नियंत्रित करतात व कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत होते आणि हृदयविकाराचा धोका घटतो अशा प्रकारे संत्री हृदयाचे आरोग्य राखते,
कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वजन कमी करण्यात मदत करते.
संत्री दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारून तोंडातील जंतुचा प्रादुर्भाव कमी करते.
संत्रीच्या रसा पेक्षा ताजे पूर्ण फळ खाणे उत्तम त्यामुळे फाइबर आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त मिळतात.
संत्र्याची साल हीसुद्धा उत्तम उपयोगी आहे. संत्र्याच्या सालीची पावडर Facepack, उटणे, अश्या स्वरूपात वापरली जाते.



