वारी पंढरीची वारी आरोग्याची

दिवस -12
फळ – खरबूज

खरबूज हे उन्हाळ्यातले दुसरे एक उपयुक्त फळ आणि उन्हाळ्यामध्येही हमखास वापरल्या जाणारे आहे. आयुर्वेदामध्ये जी काही फळे सांगितली आहेत त्यात शरीराचा मांस धातु म्हणजे वजन वाढवण्यासाठी तसेच शरीराचे बल वाढवण्यासाठी हे अतिशय उत्तम असे फळ आहे.
आजकाल खरबूज सुद्धा बाराही महिने उपलब्ध असतात व जगाच्या पाठीवरती सगळीकडे उपलब्ध असतात. विशेषतः विमानामध्ये जी काही फळे खायला देतात तर त्यामध्ये खरबूज हे नक्की असते.

साधारणतः तीन प्रकारांमध्ये खरबूज उपलब्ध आहे.
1) एक पुर्वीचे जे अतिशय गोल व जिच्यावर उभ्या रेषा असतात अशा प्रकारचे खरबूज
2) जे आत्ता बाजारात मिळते ज्याचे आवरण जाड आहे आणि थोडस पिवळसर रंगाचे आहे, आणि मधुन गोड आहे अशा प्रकारचे खरबूज
3) तिसरे जे आपल्याकडे कमी आहे पण पूर्ण जगामध्ये जे उपलब्ध असते ते मधुन हिरव्या रंगाचे टरबूज व चवीलाही अतिशय उत्तम असणारे खरबूज .

खरबूज, खरबूजाची साल आणि खरबूजाच्या बिया या तीनही गोष्टी आपल्यासाठी अतिशय उपयोगी आहेत.

●वाळवुन खरबूजाच्या बिया जर आपण रोज एक चमचाभर खाल्या तरीही वजन वाढायला मदत होते. शरीरातला जो शुक्र धातु आहे, हा धातु वाढण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.
●काही जण ग्रेव्हीमध्ये काजु ऐवजी पर्याय म्हणून याचा वापर करतात. खरबूजाच्या बियांचा उपयोग करतात.
● खरबूज चवीला गोड असते. याचा परिणाम शरीरावर थंड स्वरुपाचा असतो.
●साधारणतः २-४ फोडी आपण एका वेळी खरबूजाच्या खाऊ शकतो. साल काढूनच खरबूज खाणे हे अतिशय चांगले असते.
●सगळ्यात महत्वाचा खरबूजाचा उपयोग हा आतड्यासाठी होतो. ज्यांचे काही कारणामुळे आतडे दुबळे झाले आहेत किंवा ज्यांच्या आतड्यामध्ये कोरडेपणा राहिलेला आहे आणि त्यामुळे नित्य मलप्रवृत्ती होत नसेल तर त्यांसाठी खरबूज हे अतिशय उत्तम फळ आहे.
●संध्याकाळी ४ च्या सुमारास खरबुजाच्या ३ फोडी बारीक करून त्यावरती मीठ जीरे पूड किंवा थोडासा चाट मसाला टाकुन हे फळ खावे , याचा मलबध्दतेसाठी खुप चांगला उपयोग होता
●डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. काही दिवस नित्य खरबूजाच्या फोडी खाल्याने डोळयाचे आरोग्य सुधारते.
● त्वचेच्या व केसाच्या आरोग्यसाठी देखील खरबूजाचा चांगला उपयोग आहे.
●ज्यांच्या दातांच्या काही समस्या असतील त्यांना खरबूजाचा ज्यूस द्यावा.
●अगदी लहान म्हणजेच १२-१४ महिन्यांच जे मुल आहे त्यांनाही खरबूज mash करुन देऊ शकतो .

Author

Dirghayu

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *