वारी पंढरीची वारी आरोग्याची
आजकाल ग्रामीण भागात सुद्धा शेतकरी मंडळी शेतामध्ये सुद्धा टरबूजाची लागवड करत आहेत. पूर्वी साधारणतः ज्या बाजूला समुद्र ,पाणी असे असायचे त्या बाजूला कलिंगड किंवा टरबूज उपलब्ध असायचे.
जसे बाकीचे फळ आता नेहमी साठी मिळतात तसे काही ठिकाणी टरबूज नेहमी साठी मिळतात.
टरबूज हे पाणी जास्त असलेले फळ आहे .
शरीरासाठी टरबूज चांगले आहे का?तर नक्कीच चांगले आहे ,पण केव्हा?
ज्यावेळेस भरपूर ऊन आहे ,शरिरातून पाणी बाहेर जात आहे ,उलट्या किंवा पातळ जुलाब झाले,तर अश्या वेळेस टरबूज घ्यायला हरकत नाही.
टरबूज घेताना वरची साल काढून घ्यावी आणि मधला लाल गर त्यावर चिमुटभर जिरे ,मिरे,मीठ टाकून टरबूज घेतला पाहिजे.
टरबूजाच्या बिया ,टरबूज ची साल ,आणि टरबूज ह्या तीनिही गोष्टी उपयोगी असते .
टरबूजाच्या सालीचे फायदे –
•टरबूजाची साल उन्हाळा भरपूर आहे ,त्या ठिकाणी ही टरबूजाची साल आपल्या तळहात तळपाय ला जर चोळली,तर अतिशय चांगल्या पद्धतीने दाह किंवा शरीराची उष्णता कमी होते .
•हेच टरबूजाची साल डोळ्यावर ठेवली तर डोळ्याची आग कमी होते.
•जे आता आयटी field मधे आहेत,ज्यांना भरपूर स्क्रीन टाईम आहे,अश्यानी रोज जरी टरबूजाची साल डोळ्यावर ठेवली ,तरी त्याचा उत्तम उपयोग आहे.
टरबूजाच्या बियांचे फायदे
•टरबूजाच्या बिया उत्तम पौष्टिक आहे.शुक्रधातू ज्याला म्हणता येईल त्याला बल किंवा पौष्टिकता देण्यासाठी या बियांचा उपयोग होतो.
•बिया वाळवून पावडर करून ठेवू शकतो.
•पाव चमचा पावडर आणि दूध असे साधारणतः सलग 15 दिवस घेतला तर बल्य ,पौष्टिक म्हणून उपयोग होतो.
•शरीराची आग ,शरीरामध्ये थकवा येणे, उन्हाळ्यामधे गळून गेल्यासारखे वाटणे,तेव्हा टरबूज घेणे योग्य.हे नेमकं उन्हाळयातले फळ आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे .
टरबूज खाताना द्यावयाची काळजी –
•शक्यतो पावसाळ्यात टरबूज खाल्ला नाही पाहिजे .
•आजकाल टरबूज जे आहे ,ते लाल दिसावा ,त्याला गोडवा (साखर कंटेंट) यावा म्हणून लोक त्यामधे injection देतात,त्यामुळे टरबूज हे जपून खावे .
•रात्री शक्यतो टरबूज खाऊ नये.
•रात्री टरबूज खाले तर पोट फुग्ण्याची शक्यता आहे.
एवढी काळजी घेतली तर टरबूज आपल्यासाठी उत्तम आहे.



