वारी पंढरीची वारी आरोग्याची
दिवस -09
फळ- सीताफळ
सीताफळ हे एक लोकप्रिय फळ आहे, जे ‘कस्टर्ड ऍपल’ किंवा ‘शुगर ऍपल’ म्हणूनही ओळखले जाते हे उष्णकटिबंधीय फळ असून ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.
सीताफळाच्या अनेक जाती आहेत, जसे की फुले पुरंदर, फुले जानकी, बालानगर, अर्का सहान, एपीके-१ आणि अनोना हायब्रीड-२.
या फळाला अनेक भागांमध्ये ‘शीतफळ’ किंवा ‘ठंडी’ असेही म्हणतात, कारण ते थंड आणि चवीला गोड लागते.
ज्यांचे वजन कमी आहे, अश्यांनी वजन वाढवण्यासाठी सीताफळ नक्की खावे. सीताफळ हे शरीरातील मांसपेशी वाढवून वजन वाढवण्यास मदत करते.
सीताफळ रबडी, आइस्क्रीम हे खाण्यापेक्षा ताजे सीताफळ खाणे अधिक उत्तम यामध्ये चोखण्याचा व्यायाम होतो, यामुळे शरीरावर फारसे अपाय होत नाही.
जंगलामध्ये आपोआप येणारे सीताफळ आणि लागवड करून वाढविलेले सीताफळ ,यातील जंगलातील वाढलेल्या सीताफळाला प्राध्यान द्यावे.
सीताफळाचे गुण –
• सीताफळ हे चवीला गोड, शरीरावर थंड परिणाम करत असल्याने शरीरातील आग कमी करणारे आहे.
•सीताफळ हे शरीरातील अशक्तपणा, थकवा दूर करुन शक्ती वाढवणारे आहे.
•सीताफळाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे Cancer पेशींची वाढ कमी करतात.
•हृदयासाठी फायदेशीर:
सीताफळ खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
•पचन सुधारते:
सीताफळाचे गर हे रेषायुक्त असल्याने बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करते.
•मधुमेहावर नियंत्रण:
सीताफळामध्ये असलेले पोषक तत्व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे मधुमेह (टाइप २) चा धोका कमी होतो.
•स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर किंवा चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही शारीरिक झीज भरून येते
• सीताफळाच्या बियांची पेस्ट डोक्याला लावल्यास कोंडा व उवा कमी होण्यास मदत होते.

सीताफळ कोणी खाऊ नये
•ज्यांना सर्दी खोकला , दमा वारंवार होतो, अशा व्यक्तींनी तज्ञांच्या सल्ल्याने सीताफळ खावे.
•अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते
•बैठेकाम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे
•रात्री सीताफळ खाऊ नये.
सीताफळाचे अपाय टाळण्यासाठी चाट मसाला टाकून सेवन करावे



