सफरचंद प्रायः काश्मीर, शिमला

अशा प्रदेशातील फळ आहे. महाराष्ट्रातील काही शेतकरी आता हे फळ लावत आहे.सफरचंदाची उपलब्धता cold Storage द्वारे होते त्यामुळे ज्यांना सर्दी,खोकला, दमा व थंडी बाधत आहे त्यांनी सफरचंद, तज्ञांचा सल्ला घेऊन खाने. फळे,भाजीपाला,अन्न सामान्य नियम् असा असला पाहिजे की जे आपल्या भागात पिकते, वाढते अशांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे.
सध्या जग हे विमान, जहाज अन्य सेवेद्वारे एकमेकांशी जोडलेले असल्याने, जगातील कुठलेही फले उपलब्ध होतात, त्याचा सारासार विचार करुनच खाल्ले पाहिजे.

ज्यांना थकवा आहे अनेक काळपर्यंत विविध आजारांशी सामना केला आहे अशांसाठी सफरचंदाचा उपयोग नक्की होतो.
सफरचंदाच्या ताज्या फोडी, milkshake, Juice या स्वरुपात घेत‌ले जाते काही जन याचा मुरब्बा बनवून घेतात तसेच सफरचंदाची Apple candy ही आजकाल बाजारात उपलब्ध आहे. मधासोबत ही आपन सफरचंद खाऊ शकतो.

सफरचंद खाण्याचे मुख्य फायदे:
सफरचंदात भरपूर फायबर (विशेषतः सॉल्युबल फायबर – पेक्टिन) असते, जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
हृदयाचे आरोग्य राखते
सफरचंद कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.यातील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांना मजबूत ठेवतात,
यामध्ये व्हिटॅमिन C, ॲन्टिओक्सिडंट असल्याने, ते रोगप्रतिकारशक्ती वाढवतात,
सफरचंदामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम असल्याने हाडे मजबूत राहतात,सफरचंदाचे नियमित सेवन मेंदूच्या पेशींचे संरक्षण करते, त्यामुळे लक्ष आणि स्मरणशक्ती सुधारते.

Author

Dirghayu

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *