वारी पंढरीची वारी आरोग्याची
दिवस-06
फळ – पेरू(Guava)
पेरूचे फळ आणि पेरूच्या झाडाची पाने दोन्ही औषधी गुणधर्म देतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतात, रक्तातील साखरेचे नियमन करू शकतात, पचन सुधारू शकतात आणि बरेच काही करू शकतात.
मीठ लावून त्याची मजा घेऊन खाण्यात काय आनंद असतो हे फक्त पेरू खाणाऱ्यालाच माहित असते. थंडीचे दिवस सुरु झाल्यावर सर्वांच्या खिश्याला परवडणारा पेरु म्हणजे आरोग्य आणि सौदर्यांसाठी रामबाण उपाय आहे. चवीला तुरट, गोड आणि आंबट असणारा पेरु पोषक तत्वांनी युक्त असतो. पेरुच्या विविध जाती आहेत. पेरु आतून पांढरा किंवा गुलाबी रंगाचा असतो. हे दोन्हीही पेरु चवीला गोड आणि रुचकर लागतात. आंबट-गोड चवीच्या पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
पेरूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी व रेशेचे प्रमाण जास्त असते. यामुळे आपल्याला जर वजन जर कमी कराचे असेल तर हे फळ फायदेशीर आहे. या फळात साखरेचे गुणधर्म कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी देखील लाभदायक आहे.जर आपल्याला पोटाचे विकार झाले असतील तर पेरूवर मीठ लावून खाल्ल्याने पोटासंबंधीच्या समस्या दूर होतात. आपल्या पचन व्यवस्थेसाठी पेरू हा उत्तम पर्याय आहे.पेरू हे उच्च ऊर्जा असलेले फळ मानले जाते . त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे, तसेच पेरूमध्ये कॅलरी आणि कार्ब्सची चांगली मात्रा असते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते आणि आळस दूर होतो.पेरूमध्ये जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ भरपूर प्रमाणात असतात. म्हणून पेरू खाणे हे स्किन आणि केसांसाठी उपयुक्त ठरते.
पेरूच्या पानांचे फायदे
फळांव्यतिरिक्त, पेरूची पाने अनेक फायदे देतात, जसे की:
-पत्र तुरट असतात त्यासतव मुखपाकमध्ये चावून खावे किंवा काढा करून गुळण्या कराव्यात
-डोळ्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते
-ताण कमी करते
-त्वचा आणि केसांना फायदा होतो
-अतिसार थांबवण्यास मदत होते
-कोलेस्ट्रॉल कमी करते
पेरू कसे वापरावे:
ज्यांना मलबधत्ता असते अश्यानी पिकलेला पेरू अर्धा दुपारी ४ चे सुमारास नित्य ५ दिवस घ्यावा
पेरू साठी पाणी लागते त्यास्तव ज्यांना नेहमी सर्दी होते , दमा खोकला आहे आश्यानी कमी खावे किंवा नेहमी मिरपूड घालूनच पेरू खावा रात्री पेरू खावू न



