वारी पंढरीची वारी आरोग्याची…
दिवस – 03
फळ – जांभुळ
अति सर्वत्र वर्जयेत
काल स्वास्थ्यालयात 2,3 दिवसांपासून मल प्रवर्तन होत नाही, पोट डब्बा झाले आहे, अस्वास्थ वाटते आहे असे लक्षण घेवून रुग्ण आले होते , गेल्या आठवड्यातील 7,8 रुग्ण अशीच लक्षणे असणारे होती, सध्या अनेक ठिकाणी आरोग्य ज्ञान उपलब्ध असल्याने अनेक प्रयोग शरीरावर करण्याची स्पर्धा सुरू असते.
सध्या आंबे संपत आले आहेत, जांभुळ सुरू झाले आहे, पूर्वी मर्यादित लागवड असल्याने उपलब्धता मर्यादित होती, आता लागवड हि जास्त आहे व साधने ही भरपूर असल्याने उपलब्धता जास्त आहे, त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त जांभळे खाल्ली जातात, विशेषत: मधुमेह असणारी रुग्ण जास्त असतात, जांभूळ कुणी खावे , किती खावे, कसे खावे, केंव्हा खावे हेही शास्त्र आहे , नसता अपयाच जास्त असणार आहे.
जांभूळ, जांबु, जामुन, जांबव असे याची पर्यायी नाव आहेत, लहान व मोठी अशी व गेल्या 2 वर्षांपासून पांढरा रंग असणारी पण उपलब्ध आहेत. वर्षा काळात म्हणजे जून, जुलै मध्ये उपलब्ध होतात, तुरट रस हा प्रामुख्याने
जांभळाचा असतो, पचण्यास जड, अतिशय वात वाढवणारी , थंड गुणाची, मल घट्ट करणारी अशी असतात

जांभळाचे. श्रीखंड ही काही शहरात वर्षभर आता उपलब्ध असते .
त्यामुळे ज्यांना मलावश्टशंभ आहे अश्यानी कमी मात्रेत व मिठासहित खाल्ली पाहिजेत, मधुमेह असणारी रुग्ण मुत्र प्रवृत्ती जास्त असल्यास जांभूळ किंवा बियांचे चूर्ण घेवू शकतात.
तुरट रस कमी प्रमाणातच घ्यावा व त्याचे बरोबर अंबट व खारट पदार्थ घ्यावेत, प्रमाणात खावे , अतिरेक टाळावा.
वैद्य संतोष नेवपुरकर
दीर्घायु आयुर्वेद स्वास्थ्यालय



