आज देवशयनी आषाढी एकादशी……..
वर्षभर ज्याची आस सगळ्या वारकऱ्यांना लागलेली असते ती म्हणजे पंढरीच्या विठु माऊलींना भेटण्याची……
संपूर्ण महाराष्टच नाही तर देश- विदेशामधुन वारकरी चन्द्रभागेच्या तटी दर्शन घेण्यासाठी पोहचलेले आहेत. आजचा दिवस म्हणजे आषढी एकादशी.
वर्षभरातील महत्वाच्या आणि अनेक जण उपवास करतात अशा साधारण तीन एकादशी असतात ज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
• आषाढी एकादशी
• कार्तिकी एकादशी
• माघी एकादशी
ह्या तीन्ही एकादशींचे महत्व असे की या साधारण ऋतु बदलतांना येतात. जसे उन्हाळ्यातून पावसाळा सुरू होत असतांना आषाढी, पावसाळ्यातून उन्हाळा सुरू होत असतांना कार्तिकी आणि हिवाळ्यातून उन्हाळा सुरू होत असतांना माघी एकादशी असते.
आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर ह्या काळात शरीरातली अग्नि( पचन शक्ती) मन्द झालेली असते आणि ती सुधारण्यासाठी एकादशी वृत ( दशमी- एकादशी – द्वादशी) हे आचारणात आणले जाते………
एकादशी वृत्त हे आचरण करण्यासाठी असते. ते आपण सात्विक आहार, कमी पण प्रमाणात असा आहार, लघु ( पचण्यास हलके) असा आहार सेवन करावे.उदाहरणार्थ – राजगीरा, लाह्या, कोमट पाणी, ताक, पेज (soup) ,इ…….
आहारासोबतच चांगले पठण, भजन, पुजन, किर्तन अशारितिने परमेश्वराला समर्पित होणो ह्या द्वारे स्वार्थ व परमार्थ अशा दोन्ही गोष्टी साधल्या जातात.सगळ्या उपवासाला फळे चालतात यामुळेच आपण या वर्षीच्या “वारी पंढरीची वारी आरोग्याची” यामध्ये फळांविषयी महिती दिली आहे.
• फळे नेमकी दिवसातून केव्हा खावी असे प्रश्न अनेकांना पडलेली असतात. त्याचे उत्तर असे की साधारणता सगळीच फळे ही अम्ल ( acidic ) अशी असतात आणि त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर किंवा नाष्टा करित असतांना फळे खाणे टाळावे.
• फळे हि नेहमी स्वतंत्र खावी. आजकाल प्रवासामध्ये breakfast चा बुफे लागलेला असतो या मध्ये 3-4 प्रकाराचे फळे, 3-4 फळांचा ज्युस, आंबवलेले पदार्थ (उदा इइली, डोसा, इ) असतात. हे असे आहार सेवन करणे अतिशय चुकीचे आहे कारण ते पचण्यास अतिशय जड होते.
• काही फळे अशी असतात जी पचण्यास मदत करतात. उदाहरणार्थ – पपई.
कच्ची पपई असेल तर तीची भाजी जेवणात घेतली पाहिजे आणि पपई पिकलेली असली तर जेवणानंतर 3 तासांनी घ्यावी.

आंब्याचे वृक्ष हे मंगलकारी, पर्यावरणाचे रक्षण करणारे तसेच औषधी गुणधर्माने परीपूर्ण आहेत.
आंब्याच्या झाडाचे अनेक उपयुक्तांग आहेत जसे फळ, पाने, फुले, साल, बीज, बीज मज्जा, इ
• पक्व आम्र फळ हे चवीला गोड व अल्प प्रमाणात तुरट असते. हे फळ पचण्यास जड व वजन वाढवणारे असते.
पक्व आम्र फळ हे मनास आवडणारे, रुची(taste) वाढवणारे, रक्त- शरीरातील मांस तसेच बल वाढवणारे आहे. आणि म्हणूनच हे फळ शारीरिक काम करून दमलेल्या लोकांसाठी किंवा बारिक लोकांसाठी उत्तम आहे.
आम्रफला पासून अनेक पदार्थ बनतात जसे आंब्याचा रस, आंब्याचा शिरा, आंब्याची पोळी, बर्फी , इ
• अपक्व फळ किंवा कैरी चवीला अंबट व अल्पशी तुरट असते. जेवणातली रुची व पाचन शक्ती वाढवणारे आहे. कैरी आंबट असल्याने जर खाललेली चालत नसल्यास छुंदा, साखर आंबा, गुळ आंबा, पन्हे, शरबत असे सेवन करण्यास हरकत नाही.
• पाने :- आंब्याच्या पानांना तर खास महत्व असुन ते पुजेमध्ये , कलशामध्ये तसेच तोरण बांधतांना देखील वापरली जातात. यामध्ये औषधी गुणधर्म देखील असतात जसे उल्टी थांबवण्यासाठी उपयुक्त होते.
• फुले :- दृष्टी रोगांमध्ये उपयुक्त आहे .
• कोय :- कोकणातील अनेक शेतकरी बांधव उन्हाळ्यात कोयातील गिराच्या पिठाच्या भाकरी किंवा धिरडे करून खातात. औषधी गुणधर्म असा कि ते मलास सुसंगठीत करण्यास मदत करते.
• कोयांमधुन निघणारे तेल हे सुद्धा औषधी गुणधर्माचे आहे.
आजच्या काळात फळांची मागणी वाढलेली आहे आणि त्याचबरोबर ती वेळेत बाजारात पोहोचवण्याची स्पर्धा आहे. नैसर्गिकरित्या फळे पिकण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो. पण व्यापाऱ्यांना ती प्रक्रिया लवकर हवी असते. त्यामुळे ते रासायनिक मार्गांचा अवलंब करतात.
एका ट्रकमध्ये ढिगाने फळं, बाजूला पांढऱ्या पावडरचे छोटे पाकिट… त्या पावडरीत लपलेला असतो एक घातक धोका – कॅल्शियम कार्बाईड!भारतात दरवर्षी लाखो टन फळे कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवली जातात. ही प्रक्रिया आरोग्यासाठी किती घातक आहे हे आपण जाणूनच घेत नाही!
कॅल्शियम कार्बाईड (Calcium Carbide) हे पाण्यासोबत रसायनीक क्रिया करून Acetylene gas उत्पन्न करतो.ही Acetylene gas फळांवर वापरल्यास ती पावसाळी किंवा नैसर्गिक इथिलीन प्रमाणे वागते, पण ती विषारी आहे.
शरीरावर होणारे परिणाम
➤ अल्पकालीन परिणाम
डोकेदुखी, चक्कर, मळमळ, उलटी
डोळ्यांची जळजळ, तोंडात खरचटल्यासारखे वाटणे
त्वचेला वास येणे किंवा चर्मरोग
➤ दीर्घकालीन परिणाम
कॅल्शियम कार्बाईडमध्ये आर्सेनिक व फॉस्फरस हायड्रोक्साइड सारखी विषारी तत्त्वे असतात.
यामुळे होणारे धोके:
कर्करोग (Cancer)
नर्व्हस सिस्टम डॅमेज
किडनी आणि यकृताचे नुकसान
गर्भवती स्त्रियांमध्ये गर्भविकृती
लहान मुलांमध्ये मेंदूच्या विकासावर परिणाम.
फळे हि नेहमी नैसर्गीक रित्या पिकवुन मग खावी. यासाठी कच्ची फळे वाळलेल्या गवतात ठेवणे, कपड्यात झाकुन ठेवणे किंवा कागदी पिशव्या मध्ये ठेवुन मग ते पक्व करावे.
आंबा हे फळ कशा प्रकारे खावे ?
आंबा माचून चोखून खाता येतो याने मुखास उत्तम व्यायाम होतो, फोडी खाता येतात , आंब्याचा रस हा जेवणात घेता येतो तो घेतांना त्यात तूप व मिरपूड घालून घ्यावा म्हणजे बाधत नाही


