वारी पंढरीची वारी आरोग्याची

दिवस – 16
फळ – अननस
अननस किंवा Pineapple ह्या नावाने ओळखले जाणारे हे फळ किंचित गोड आंबट असते. सतत उपवास करणाऱ्यांसाठी उपयोगी. अननसाच्या फोडी, रस , जाम, शिरा किंवा भातामध्ये टाकून खाल्या जातात.
ज्यांना मलबद्धतेची सवय आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी फक्त २ फोडी रोज खाव्यात .
अननस हे असे फळ आहे, जे साधारणपणे दिसायला हिरवे आणि रंगाने पिवळे आहे.
अननसाचा रस हाडांच्या मजबुतीसाठी खूप चांगला आहे, कारण त्यात सर्व खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. ज्यांची हाडे कमकुवत आहेत अशा महिला आणि मुलांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.
केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी अननस खूप चांगले आहे, त्यामुळे केस मजबूत राहतात, त्यामुळे केसांची वाढही चांगली होते.
अननस हे आंबट गोड असल्याने चव वाढवणारे, आतड्यांची क्रिया वाढवून पचन क्रिया वाढवणारे आहे.
पोटात जंत झाले असल्यास अननसाचा रस घ्यावा.
अननसाचा रस मुत्राचे प्रमाण वाढविणारा आहे त्यामुळे मुत्रासंबंधी आजारांमध्ये रस घ्यावा.

अननस खाताना ची घ्यावयाची काळजी :
•कोणत्याही हंगामी फळामुळे हानी होत नाही, परंतु त्याच्या सेवनाची पद्धत आणि वेळ योग्य असावी. ठराविक प्रमाणात घेतलेले फळ फायदेशीर ठरते, मात्र जास्त प्रमाणात सेवन केल्यास तेच फळ हानिकारकही ठरते. विशेषत: शुगर पेशंट, किंवा इतर कोणताही आजार ज्यामध्ये डॉक्टरांनी मनाई केली आहे, त्यांनी अजिबात सेवन करू नये.
•अननस उपाशीपोटी कधीही खाऊ नये.
•अननस गर्भवती स्त्रियांनी खाऊ नये.

Author

Dirghayu

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *