वारी पंढरीची वारी आरोग्याची
मृद्विका फलानां
आयुर्वेदीय ग्रंथ चरक संहितेत आचार्य चरकांनी 25 व्या अध्यायात , 38 व्या सुत्रात “सर्व फळांमध्ये द्राक्षे हे सर्वश्रेष्ठ फळ सांगितले आहे.”
द्राक्षे हे चवीला गोड असणारे व हृदयास प्रिय वाटणारी, पचायला हलकी, आणि स्वादिष्ट व पथ्यकारक फळ आहे, द्राक्षे (अंगूर) हे फळ केवळ चवीलाच गोड नसून, शरीराच्या सातही धातूंपैकी शुक्रधातूवर विशेष पोषणदायक व वर्धक परिणाम करणारे आहे, म्हणूनच ते वृष्य ( कामोत्तेजक) मानले जाते, “द्राक्षा थंड असल्याने तृष्णा निवारण करते” द्राक्षे ही तहान कमी करतात, थंडावा देतात, शरीरातील उष्णता संतुलित करतात.
काळ्या मनुकांचे फायदे:
1.रक्त वाढवते (हीमोग्लोबिनसाठी उपयोगी)
काळ्या मनुकांमध्ये लोह (Iron) भरपूर असते, ज्यामुळे अॅनिमिया (anemia) असणाऱ्यांसाठी हे उत्तम आहे.
2.त्वचेसाठी फायदेशीर
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तरुण राहते, सुरकुत्या कमी होतात, आणि नैसर्गिक तेज टिकते.
3.पचन सुधारते
यातील फायबर्स (आहारीय तंतू) पचन सुधारतात आणि मलावरोध दूर करतात.
4.हृदयासाठी हितकारक
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, कोलेस्टेरॉल कमी करते, आणि हृदयविकाराचा धोका घटवते.
5.हाडे मजबूत करतात
यामध्ये कॅल्शियम आणि बोरोन असून ते हाडांची ताकद वाढवतात.
6.उर्जादायक (Instant Energy)
नैसर्गिक साखरेमुळे दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी उपयुक्त आहे.
7.पाळीशी संबंधित समस्या
महिलांमध्ये मासिक पाळीतील अशक्तपणा, पाठीचा त्रास, अशुद्ध रक्त यावर फायदेशीर.
8.लिव्हर आणि किडनीसाठी उपयोगी
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
9.मनुके एक घरगुती टॉनिक म्हणून सर्व वयोगटातील व्यक्तीस उत्तम आहे.
10.आयुर्वेदात दाक्षांचे अनेक औषधी जसे द्राक्षासव, दाक्षावलेह विवीध विकारांत उपयोगी ठरतात .
सावधगिरी:
•मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने खाऊ नये.
•अतीप्रमाणात घेतल्यास जुलाब किंवा पोट फुगण्याची शक्यता असते.



