वारी पंढरीची वारी आरोग्याची…
दिवस – 04
फळ – खजुर (dates)
सघः काळात अनेक लोकं असे विचार करतात की गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अनेक रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर असे अगदी सहज पणे सांगतात की त्यांनी वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ सेवन करणे अगदीच बंद केले आहे…..
# हे असे विचार करणे हे कितपत योग्य आहे ?
आयुर्वेदामध्ये षडरसात्मक आहार ( अर्थात असा आहार ज्यामध्ये 6 प्रकारच्या चवींचा समावेश असतो जसे गोड, अंबट , खारट , तिखट , कडु व तुरट ) व योग्य त्या प्रमाणात सेवन करणे योग्य सांगितले आहे…….
यावरून ही बाब लगेचच लक्षात येते की गोड खाणे पूर्णतः बंद करणे हे अतिशय अपाय कारक होऊ शकते………
अगदी सामान्य नियम म्हणुन असे लक्षात ठेवायला हवे की नैसर्गीक रित्या अढळणारी साखर ही शरीरासाठी अजीबाद अपायकारक नसते याउलट जर गोड पदार्थ अगदीच खाणे बंद केल तर विविध त्रास जसे उत्साह न वाढणे, आळस जास्त येणे, अन्नाची चव न वाटणे, तोंड कारडे पडणे, शरीरात जडपणा जाणवणे, इ.

“खजुर” असेच एक उत्तम उदाहरण आहे मध्ये नैसर्गीक रित्या अढळणारी fructose साखर आहे जी शरीरास त्वरीत ऊर्जावान बनवते.
•असे लोकं जे दिवसभर काम करून थेकलेले असतात व त्यांना त्वरीत व बऱ्याच वेळ ऊर्जा हवी असेल तर अशा वेळी खजुर सारखं दुसरं फळ नाही….
•ज्यांना आपले वजन वाढवायचे असेल त्यांच्या साठी देखील खजुर हा उत्तम पर्याय आहे.
•ज्यांचे गुढगे दुखतात, किंवा ज्यांच्या हाडांमध्ये fracture किंवा tear झाले आहे त्यांच्यासाठी तर खजुर वर्दानच आहे.
•अगदीज कमी वय असले तरी ज्यांचे केस गळतात किंवा ज्यांच्या शरीरात haemoglobin (रक्त कमी आहे) त्यांनी सुद्धा खजुर खायला हरकत नाही.
•खजुर हे हृदयासाठी देखील उत्तम असते.
• शरीरातील muscles वाढविण्यासाठी उत्तम आहे.
• जे नेहमी उपवास करतात, पौष्टिक म्हणून काय खाऊ असे विचारतात त्यांच्यासाठी खजूर उत्तम आहे.



