वारी पंढरीची वारी आरोग्याची…
दिवस – 02
फळ – केळी (Banana🍌)
आपल्या भारतीय संस्कृतीत केळ्याला विशेष स्थान आहे – पूजेत, पंगतीत, आणि अगदी औषधांमध्येही केळीला पूर्ण अन्न गृहित धरले जाते.
पण केळी केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत ,उपयुक्त आहे.
केळीचे गुण –
• केळी ही मधुर रसात्मक व अल्पशी तुरट आहे. शीत, मृदु व गुरू गुणात्मक आहे.
• केळी अल्प मात्रेत खाल्ली तर पाचन शक्ती वाढवते तशीच शरीरातील उष्णता कमी करते.
• त्वरीत ऊर्जा देणाऱ्या फळांमध्ये केळी अगदीच उत्तम आहे.
• अति अशनासाठी, वजन वाढविण्यासाठी तसेच शांत झोप लागण्यासाठी केळी उत्तम असते.




