वारी पंढरीची वारी आरोग्याची…

दिवस – 01

पाऊले चालती पंढरीची वाट
आपण करूया आरोग्याची आस✨
आज पासून पंढरीची वारी, पवित्र व ऐतिहासिक धार्मिक यात्रेचा आरंभ होत आहे.
भक्तमंडळी माऊलींची आराधना व उपवास हे आर्वजुन करतातच आणि उपवास म्हटला कि फलाहार करणारे अधिकाधिक जनता असते…….
सघः काळात कोणत्याही विषयाची माहिती मिळवणे हे अगदिच सहज व सोपे झालेले आहे… जसे फक्त एका क्लिक वर लगेचच कोणतीही माहिती उपलब्ध असते , अनेक लोकं आपले वेगवेगळे मते सांगण्यास अतिशय तत्पर असतात…… इतकेच नव्हे तर पॉडकास्ट, युट्युब वर असणारे अनेक व्हिडिओ, इ सर्वसाधारण जनतेसमोर अगदी लगेचच उपलब्ध असतात……. आणि म्हणूनच त्यामधील चुक काय बरोबर काय याचा सारासार विचार न करता लगेचच लोके आपल्या शरीरावर विविध प्रयोग करून बघतात आणि बऱ्याच वेळेस याचे परिणाम गंभीर व व्याधी स्वरूपात दिसुन येतो.

लोकांमध्ये फळां संबंधीत अनेक गैरसमज आहेत आणि प्रश्ने आहेत जसे फळे केव्हा खाल्ली पाहिजे ? फळे व दुध एकत्र खावे कि नाही ? काही लोकांच्या मतानुसार फळांचा ज्युस घ्यावा तर काही म्हणतात असे करणे योग्य नाही, पण नेमकी बरोबर काय ???? मधुमेह असल्यास रुग्णांनी फळे खावे की नाही?????
अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे दीर्घायु आयुर्वेद स्वास्थ्यालय वाचकांना उपलब्ध करून देत आहे… तरी विविध फळांविषयी माहिती जाणुन घेण्यासाठी वाचत रहा” वारी पंढरीची वारी आरोग्याची”

Author

Dirghayu

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *